मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

सानुग्रह अनुदानाची पावती दाखवा - रास्त भाव दुकानातून मोफत धान्य घ्या - जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे


सांगली (जि. मा. का.) दि. 20 :  सांगली  व मिरज शहरामधील पुरबाधित कुटुंबाना शासन निर्णयानुसार प्रति कुटुंब 10 किलोग्रॅम गहू व 10 किलोग्रॅम तांदूळ तसेच 5 लिटर केरोसिन मोफत वाटप करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी पूरग्रस्तांना मोफत धान्य वाटप सुरु आहे. नागरिकांनी त्यांना सानुग्रह अनुदान मिळाल्याची मूळ पावती तसेच ज्या कुटुंबाकडे स्वत:चे आधारकार्ड किंवा रेशनकार्ड सारखा इतर पुरावा उपलब्ध असल्यास तो त्यांनी अधिकचा पुरावा म्हणून सोबत ठेवून लगतच्या रास्त भाव दुकानदाराकडे जावून पावती दाखवून मोफत धान्य घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे.
            हरिपूर व सांगलीवाडी येथील पूरग्रस्त नागरिकांना मोफत धान्य वाटप त्यांच्या हरिपूर व सांगलीवाडी येथील रास्त भाव दुकानातूनच सुरु असून तेथूनच त्यांनी मोफत धान्य प्राप्त करून घ्यावे. सांगली मिरज मनपा क्षेत्रात आजअखेर 8698 कुटुंबाना गहू व तांदूळ प्रति कुटुंब याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे. तसेच केरोसिन 2050 लिटर प्रति कुटुंब 5 लिटर याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे. बाधित कुटुंबाना मार्गदर्शन अथवा चौकशी करावयाची असल्यास संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनी श्रीमती बारवे यांनी केले आहे.
            महापूर बाधित परिसर /भाग, धान्य वाटप करण्याचे ठिकाण व कंसात संबंधित पुरवठा निरीक्षक/संपर्क अधिकारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे. गवळीगल्ली, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ चौकी , पेठभाग, गणपती पेठ, सराफ कट्टा, महात गल्ली, बागवान गल्ली, खाटीक गल्ली, तेली गल्ली, बागवान जमियत रोड, बुरुड गल्ली, गुजर बोळ, राजपूत बोळ - शक्ती भवानी क्रीडा मंडळ गवळी गल्ली, मगरमच्छ कॉलनी मो.क्र. 9370030303 (बी. बी. कोळी, निरीक्षक सांगली मो. क्र. 8605355783).
            जामवाडी, पटेल चौक, कर्नाल रोड, गणपती पेठ पश्चिम भाग, मरगुबाई मंदिर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड पूर्व बाजू - मुक्ताई बचत गट जामवाडी, मो. क्र. 9518555859.  वखारभाग, रतनशी नगर - एम. एम. शिंदे, वखारभाग, मो. क्र. 9850622759. जामवाडी, पटेल चौक, कोकणे गल्ली, टांगा अड्डा, गणपती पेठ, वसंत जामवाडी - सावित्रीबाई फुले म ब गट पटेल चौक मो.क्र. 9422614948.  वखारभाग, महावीरनगर, अप्पासाहेब पाटील नगर, जुना बुधगाव रोड, इद्गाह मैदान रोड, गायत्रीनगर, कोळी बिल्डींग, आमराई, रतनाशीनगर, त्रिमूर्ती टॉकिज परिसर - जीवन बाबर वखार भाग मो.क्र. 9370030303.
पंचशीलनगर, शिंदे मळा, वाल्मिकी आवास परिसर, कलानगर, संभाजीनगर, श्री कॉलनी - नर्मदा महिला बचतगट पंचशीलनगर मो.क्र. 9823507077. कलानगर, टिंबर एरिया, संभाजी कॉलनी, मीरा हौसिंग सोसायटी, संजय गांधी झोपडपट्टी, गोकुळनगर परिसर -  एम के खंडागळे मीरा हौसिंग सोसायटी मो.क्र. 9764018668. (बी. बी. कोळी, निरीक्षक सांगली मो. क्र. 8605355783).
गावभाग, शिकलगार गल्ली, सिद्धार्थ परिसर - सविता वळीव  गावभाग, मो.क्र. 9421222939.  गावभाग, पेठभाग, गाढव गल्ली, पाटील गल्ली, आरवाडे हायस्कूल मागील परिसर, बावडेकर वाडा, जोशी गल्ली, खाडिलकर गल्ली, विष्णूघाट परिसर, नपाशाळा नं 2 मागील बाजू, गवळी गल्ली, पांजरपोळ संस्थान शेजारी, हरिपूर रोड,चांभारवाडा, ढोर गल्ली - एन डी लांडगे गावभाग, मो. क्र. 8626088778. एसटी स्टँड परिसर, कोल्हापूर रोड, पत्रकारनगर, भारतनगर - अन्तुबाई शिरंबेकर कोल्हापूर रोड भारतनगर मो.क्र. 9960449355 /7058038114. गावभाग, सिद्धार्थ परिसर, हरिपूर रोड, पाटणे प्लॉट - समृद्धी बचतगट गावभाग गाढव गल्ली मो.क्र. 9860247055. (श्री ए व्ही हांगे मंडळ अधिकारी मालगाव मो.क्र. 9922953898). 
गणेशनगर, आलिशान चौक, रमामातानगर, काळे प्लॉट, गारपीर चौक, इंदिरानगर, स्वमिंग टंक जवळ - उल्हास चव्हाण गणेशनगर मो. क्र. 9834708486. शामरावनगर, विनायकनगर, 100 फुटी रोड, आकाशवाणी परिसर, 50 फुटी रोड, पाकीजा मस्जिद परिसर - जि डी आवळे शामरावनगर, मो. क्र. 7796016020. खणभाग, बदाम चौक, हिंदू मुस्लीम चौक, दत्तनगर, जुनी पोलीस लाईन, स्टेशन चौक परिसर , नळभाग, तारवान गल्ली, मकान चौक खालची बाजू - जवाहर नागरी पतसंस्था खणभाग, बदाम चौक मो.क्र. 8055171177. फौजदार गल्ली, खणभाग, बापट बाल शाळेसमोरील परिसर, फौजदार गल्ली परिसर, हिराबाग कॉर्नर परिसर - एस वाय पखाली फौजदार गल्ली, रिसाला रोड मो.क्र. 8087220708. (श्री. वडार जी. एस., पुरवठा निरीक्षक सांगली मो. क्र. 8055832553).
मिरज शहरामधील पुरबाधित परिसर, नदीवेस परिसर - श्रीमती एम.जी. माळी नदीवेस परिसर मो. क्र. 8999303168 (श्री. कानडे  मो. क्र. 9860450873).
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा