शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडील प्रशिक्षणासाठी संपर्क साधा


सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील दानखणी, मादींग, मिनी-मादींग, मातंग, मांग, मांग (मांग महाशी), मादिगा, मांग गारूडी, राधे मांग, मदारी या जातीतील लोकांच्या नोंदणीकृत बहुउद्देशीय, सेवाभावी संस्थांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध व्यवसायिक व शैक्षणिक विषयांशी निगडीत प्रशिक्षण देण्यासाठी व प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी तसेच या समाजातील लोकांच्या नोंदणीकृत बहुउद्देशीय, सेवाभावी संस्थांच्या अध्यक्ष व सदस्यांनी संस्थेची संपूर्ण अद्ययावत माहिती व कागदपत्रासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल. ए. क्षीरसागर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा