गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

पूरबाधित 45 हजार 969 कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली (जि. मा. का.) दि. 22 : जिल्ह्यात आलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर पूरपश्चात उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. पूरग्रस्त कुटुंबाना तातडीची मदत म्हणून 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसीन या प्रमाणे मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. दिनांक 21 ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात 45 हजार 969 कुटुंबाना 4596.9 क्विंटल गहू व 4596.9 क्विंटल तांदूळ तर 19 हजार 298 कुटुंबाना 96 हजार 490 लिटर केरोसीनचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
 सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 104 गावातील बाधीत कुटूंबापैकी एकूण 87 हजार 939 कुटूंबे बाधित होती. त्यापैकी 45 हजार 293 ग्रामीण व 42 हजार 646 शहरी होती. 21 ऑगस्ट रोजी यातील 738 कुटूंबातील 3222 व्यक्ती स्थानांतरीत आहेत. सध्यस्थितीत स्थानांतरीत व्यक्ती करीता 1 निवारा केंद्र शहरी भागात सुरू असून यामध्ये एकूण 8 कुटुंबातील 39 व्यक्ती आहेत. ग्रामीण भागात कोणतेही निवारा केंद्र नाही.

1 कोटी 18 लाख 98 हजार 150 रूपये पशुधनाचे नुकसान
पुरामुळे आजअखेर 28 व्यक्ती मयत आहेत तर पशुधनाचे अंदाजित नुकसान 1 कोटी 18 लाख 98 हजार 150 रूपये एवढे असून यामध्ये गाय व म्हैस वर्गीय 332 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर वर्गीय 108 जनावरे, उंट, घोडा व बैल 5 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर 113, कोंबड्या व इतर पक्षी 31 हजार 172 पशुधनाचे नुकसान झाले आहे.

11 हजार 809 घरांचे नुकसान
महापुरामुळे जिल्ह्यातील 3 हजार 877 घरे पूर्णत: तर 7 हजार 932 घरे अंशत: पडली आहेत. पडझड व नष्ट झालेल्या 146 झोपड्या असून 101 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

186 वैद्यकीय पथकांमार्फत उपचार
जिल्ह्यात 186 वैद्यकीय पथके कार्यरत झाली असून या वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रात 52 वैद्यकीय पथके व ग्रामीण भागात 134 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कॅम्पची संख्या कमी झाल्याने या पथकातील कर्मचारी 26 तात्पुरत्या उपचार केंद्र व ४ मोबाईल युनिटमधून रूग्णांना तात्पुरत्या उपचार सुविधा पुरविणार आहेत.

9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप
लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत असून 9 हजार 751 बिस्कीट पाकीटे, 69 हजार 751 पिण्याचे पाणी बॉक्स, 415 किलो दूध पावडर पाकिटे, 194 डझन मेणबत्या, 43 हजार 441 भोजन पाकिटे, 35 हजार 411 किलो रवा, साखर, आदि अन्नधान्याचे वाटप, 9 हजार 318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट, 8 हजार 560 भांड्यांचे किट यांचे वाटप करण्यात आले आहे.
सांगली येथील प्राप्त जनरल औषधे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तसेच जनावरांची औषधे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तहसिलदार कार्यालय मिरज, पलूस व वाळवा येथे प्राप्त जनरल औषधे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत.
एसटी महामंडळाकडील 1 मार्ग बंद
अद्यापही राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडील 1 मार्ग बंद आहे तर 329 एटीएम पैकी 47 एटीएम बंद अवस्थेत आहेत. उर्वरित कार्यरत असलेल्या एटीएम मधून 50.31 कोटी निधी उपलब्ध आहे.
 
मृतांच्या वारसांना आतापर्यंत 1 कोटी 19 लाख रूपयांची मदत वितरीत
28 मयत व्यक्तींपैकी 19 मयत व्यक्तींच्या वारसांना रूपये 4 लाख सानुग्रह अनुदान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रूपये 1 लाख असे 5 लाख रूपये या प्रमाणे एकूण 95 लाख रूपयांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. अन्य 6 व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी 4 लाख रूपये या प्रमाणे एकूण 24 लाख रूपये असे एकूण 1 कोटी 19 लाख रूपये वितरीत करण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 6 मयत व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रूपये अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा