गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

45 हजार 969 पुरबाधित कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण


सांगली (जि.मा.का.) दि. 22 : पूरबाधित 45 हजार 969 कुटुंबाना एकूण 4596.9 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ आणि 19 हजार 298 कुटुंबाना 5 लिटर प्रमाणे 96 हजार 490 लिटर केरोसीन दिनांक 21 ऑगस्ट अखेर वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
            यामध्ये मिरज तालुक्यातील 10 हजार 573 कुटुंबाना 1057.3 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 16 हजार 860 लिटर केरोसिन, महानगरपालिका क्षेत्रात 12 हजार 351 कुटुंबाना 1235.1 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 12 हजार 150 लिटर केरोसिन, वाळवा तालुक्यातील 8 हजार 641 कुटुंबाना 864.1 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 33 हजार 640 लिटर केरोसिन, शिराळा तालुक्यातील 575 कुटुंबाना 57.5 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 2 हजार 970 लिटर केरोसीन आणि पलूस तालुक्यात 13 हजार 829 कुटुंबाना 1382.9 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ आणि 30 हजार 870 लिटर केरोसिन वितरित करण्यात आले आहे.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा