बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

41 हजार 556 पुरबाधित कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण

सांगली (जि.मा.का.) दि. 21 : पूरबाधित 41 हजार 556 कुटुंबाना गहू, तांदूळ आणि केरोसीनचे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
            यामध्ये मिरज तालुक्यातील 10 हजार 46 कुटुंबाना 1004.6 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 16 हजार 535 लिटर केरोसिन, महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 117 कुटुंबाना 1011.7 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 8 हजार 625 लिटर केरोसिन, वाळवा तालुक्यातील 7 हजार 971 कुटुंबाना 797.1 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 24 हजार 815 लिटर केरोसिन, शिराळा तालुक्यातील 575 कुटुंबाना 57.5 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 2 हजार 970 लिटर केरोसीन आणि पलूस तालुक्यात 12 हजार 847 कुटुंबाना 1284.7 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ आणि 23 हजार 730 लिटर केरोसिन वितरित करण्यात आले आहे.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा