शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

पूरबाधितांना 11 हजाराहून अधिक जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप

सांगली, दि. 24 (जि.मा.का.) : पूरबाधित लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दिनांक 23 ऑगस्ट पर्यंत  9 हजार 975 बिस्कीट पाकीटे, 71 हजार 430 पिण्याचे पाणी बॉक्स, 469 किलो दूध पावडर पाकिटे, 194 डझन मेणबत्या, 43 हजार 441 भोजन पाकिटे, 36 हजार 16 किलो रवा, साखर, आदि अन्नधान्याचे वाटप, 11 हजार 209 जीवनोपयोगी वस्तुंचे किट, 10 हजार 152 भांड्यांचे किट यांचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
सांगली येथील प्राप्त जनरल औषधे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तसेच जनावरांची औषधे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तहसिलदार कार्यालय मिरज, पलूस व वाळवा येथे प्राप्त जनरल औषधे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा