रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्त बाधित कुटुंबांना 13 कोटी 92 लाखाचे सानुग्रह वाटप

सांगली, दि. 18 (जि.मा.का) : जिल्ह्यात पुरामूळे बाधित झालेल्या कुटूंबांना रूपये ५ हजार प्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत आहे. दिनांक १७ ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील १९ हजार १३९ आणि शहरी भागातील ८ हजार ७०१ कुटूंबांना १३ कोटी ९२ लाखाचे सानुग्रह अनुदान पूरग्रस्त कुटूंबांना वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
      पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात १० हजार आणि शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी ५ हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.
जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना २०० टीममार्फत सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. सानुग्रह वितरणाच्या मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यातून महसूलचे ५२ कर्मचारी उपलब्ध झाले असून यामध्ये ४७ तलाठी आणि ५ सर्कल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने सानुग्रह अनुदान वितरण करण्यास मदत होणार आहे, असे अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा