गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

१४ हजार ४२५ कुटुंबांना आतापर्यंत ७ कोटी २१ लाख २५ हजार सानुग्रह वाटप - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 15 (जि.मा.का) : जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसलेल्या तालुक्यांमध्ये सानुग्रह अनुदान वितरण सुरू झाले असून वितरणासाठी २५ कोटी रूपयांचा निधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ४२५ पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रूपये या प्रमाणे ७ कोटी २१ लाख २५ हजार रूपयांचा निधी  सानुग्रह अनुदान म्हणून वाटप करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
      पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात १० हजार आणि शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी ५ हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. यात ग्रामीण भागातील १० हजार ७३२ आणि शहरी भागातील ३ हजार ६९३ अशा एकूण १४ हजार ४२५ कुटुंबांना ७ कोटी २१ लाख २५ हजार रूपयांचा निधी  वाटप करण्यात आला आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा