शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा गठीत

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : नागरी / शहरी भाग वगळता डिफेसमेंट ॲक्ट १९९५ मधील तरतुदींचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविलेली आहे. त्यासाठी महानगरपालिका / नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्र वगळता अन्य क्षेत्राकरिता नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून जिल्हास्तरावर तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी तक्रार निवारण यंत्रणा गठीत केली आहे.
तक्रार निवारण यंत्रणेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक धर्मादाय आयुक्त, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली/मिरज, विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली, कार्यकारी अभियंता इ  व द जिल्हा परिषद सांगली, प्रादेशिक अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ सांगली, व्यवस्थापक भारतीय रेल विभाग मिरज, संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार हे सदस्य आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी सांगली हे सदस्य सचिव आहेत. तक्रार निवारण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0233-2600363 व टोल फ्री क्रमांक 1077 आहे. ई-मेल आयडी sanglirdc@gmail.com असून तक्रार नोंदणी व निवारण माहिती प्रसिध्द करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे नाव www.sangli.nic.in असे आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा