रविवार, २२ मार्च, २०२०

सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत कलम 144 लागू 23 मार्च रोजीचे 05.00 वाजेपर्यंत संपूर्ण संचार बंदी


सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. देशातील व राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सांगली जिल्ह्यात लोकांनी एकत्र येवून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये या पार्श्वभूमीर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दिनांक 22 मार्च 2020 रोजीचे 21.00 वाजल्यापासून ते दिनांक 23 मार्च 2020 रोजीचे 05.00 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. सदर कालावधीत संपूर्ण संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असणाऱ्या व अन्य अत्यावश्यक सेवा सुविधा व वस्तू यांच्या पुरवठ्याशी संबंधित व्यक्ती व वाहने आणि कोणत्याही स्वरूपाच्या निकडीच्या प्रसंगास (emergency) व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा