गुरुवार, १९ मार्च, २०२०

पानपट्टी, मावा विक्री, तंबाखुजन्य पदार्थ विक्री केंद्रे 31 मार्च पर्यंत बंद - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहे. या अन्वये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व पानपट्टीधारक, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थाच्या माध्यमातून थुंकीमधून प्रसार होऊ नये याकरीता जिल्ह्यातील पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ विक्री केंद्र दिनांक 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहेत.
तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा