गुरुवार, २६ मार्च, २०२०

जिल्ह्यात सद्यस्थितीत 491 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये

सांगली (जि.मा.का) 26 : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 643 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 49 व्यक्ती आसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 28 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 9 जणांचे स्वॉब टेस्ट पॉझिटीव्ह आले आहेत 12 व्यक्तींचे स्वॅब रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत. उर्वरित होम क्वारंटाईनमधील 594 व्यक्ती पैकी 103 व्यक्तींचा 14 दिवसाचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 491 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आली.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा