गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोना : बाजारपेठांमधील वाहनांची गर्दी कमी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शहरी भागातील प्रमुख बाजारपेठांमधील अन्य ठिकाणी प्रवासी वाहनांमुळे होणारी गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक ते पर्यायी मार्ग किंवा दिवसाआड वाहतूक किंवा वेळेत बदल किंवा अन्य योग्य त्या उपाययोजना करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलीस विभागास दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा