शुक्रवार, २७ मार्च, २०२०

जीवनावश्यक वस्तुंच्या घरपोच सुविधेचा लाभ घ्या कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत


सांगली (जि.मा.का) 27 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य केंद्र सरकार यांनी 21 दिवसांची संचारबंदी लॉकडाऊन लागू केले आहे. सर्व नागरिकांनी याला संपूर्ण प्रतिसाद द्यावा. कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून घरपोच सुविधेसारख्या अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, कोरोना विषाणूची संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी घराबाहेर पडणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रूग्ण हे इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी. लॉकडाऊनचे अतिशय काटेकोरपणे पालन अत्यावश्यक आहे.
ग्रामीण क्षेत्रातही दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने 100 हून अधिक प्रशिक्षीत डॉक्टरांची वैद्यकीय स्वयंमसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना मुंबई, पुणे इतरत्र ठिकाणाहून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणे, त्यांना काही अडचणी असतील त्यांची सोडवणूक करणे ही कामे या मेडिकल टीम्स करत आहेत. प्रत्येक गावात प्रतिबंधक उपाययोजनांची सर्व दूर प्रचार प्रसिध्दी केली आहे, सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करून वातावरणाचे पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण केले आहे. जर कोणी बाहेरून परदेशवारी करून आलेले प्रवासी अजूनही यादीत नसतील तर कंट्रोल रूमला कळवावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा