गुरुवार, २६ मार्च, २०२०

सांगली, मिरज व कुपवाड शहरात जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा -जिल्हा पोलीस प्रशासन

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : कोरोना या विषाणूचा वाढता पादुर्भाव पाहता संपूर्ण सांगली जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचार बंदी कालावधीत नागरिकांची गैरसोय होवू नये. यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या शहरात सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू (किराणा, भाजीपाला, दूध, औषध) घरपोच देण्याची सेवा करण्यात आलेली आहे. तरी नागरिेकांनी संचार बंदी काळात घराबाहेर पडू नये व या सेवेचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक- औषधे -9325251555, किरकोळ किराणा-9823180070, भाजीपाला -9970555570, दुध -9822132222, इतर सेवेसाठी -9423871888
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा