गुरुवार, २६ मार्च, २०२०

सांगली जिल्ह्यातील आणखी 5 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह कोरोना पॉझिटिव रुग्णांची एकूण संख्या 9 - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅब चे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना  रुग्णांची संख्या 4वरून 9 झाली आहे. अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा