शुक्रवार, २० मार्च, २०२०

कोरोना : एमआयडीसी क्षेत्रात कामगारांची वारंवार तपासणी करा संसर्ग टाळण्यासाठी कामगारांची संख्या कमी ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : कोेरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या उद्योजकांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवावी, 50, 55 वर्षावरील कामगारांना शक्यतो सुट्टी द्यावी, शक्य त्या ठिकाणी घरातूनच काम करावे. कामगारांची येताना जाताना तपासणी करून कोणालाही काही त्रास आहे का ते पहावे कोणालाही काही त्रास असल्यास त्यांना कामाच्या ठिकाणी येऊ देता त्यांना वैद्यकीय उपचार द्यावेत. जर कोणी परदेश वारी करून करून आले असेल त्यांना काही लक्षणे असो किंवा नसो तरीही त्यांची माहिती तात्काळ द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, औद्योगिक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसीमध्ये असणाऱ्या मशनरीची वारंवार स्वच्छता ठेवावी. विशेषत: ज्या ठिकाणी कामगारांचा स्पर्श होतो त्याची वारंवार स्वच्छता करणे आवश्यक आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोणीही घाबरून जावू नये, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कामगारांना वारंवार हात स्वच्छ धुण्याच्या वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याचा सुचना द्याव्यात. गर्दी टाळण्यासाठी मिटींग, ट्रेनिंग, सेमिनार, कॉन्फरन्स घेऊ नयेत. कॅन्टीनमधील स्टाफही एकाच शिफ्टमध्ये ठेवता दोन वेगळ्या शिफ्टमध्ये करून त्यांची संख्या कमी करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, एमआयडीसी क्षेत्रातील कामगारांची नेहमी तपासणी करावी यासाठी फिल्ड मॅनंेजरची नियुक्ती करावी कोणाला काही त्रास असल्यास त्याबाबतची माहिती द्यावी. गर्दी टाळण्यासाठी शिफ्टमध्ये काम करावे. स्टील मशनरीची स्वच्छता ठेवावी. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेबाबत स्वत: शिस्त लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कामगार त्यांचा परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी उद्योजकांनी एमआयडीसी क्षेत्रात आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा