गुरुवार, २६ मार्च, २०२०

मुंबई पुण्याहून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीची जबाबदारी प्रशिक्षित समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेचे CEO व DHO यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 100 हुन अधिक समुदाय वैद्यकीय अधिकारी (CHO) स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार झाले आहेत. हे सर्व डॉक्टर पुणे, कराड, इचलकरंजी येथे प्रशिक्षण घेऊन आले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात त्यांना नियुक्त केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
या CHO ना केवळ पुणे मुंबई व बाहेरगावाहून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे गावाच्या पातळीवर नागरिकांनी घाबरून न जाता या प्रवाशांची नावे THO ना कळवली किंवा खालील लिंक वर भरली तर त्यांची तपासणी करणे शक्य होईल. https://forms.gle/J1avKMTDGV34Ae7n9 असे कळविण्यात आले आहे.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा