सोमवार, २३ मार्च, २०२०

सांगली जिल्ह्यातील 4 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

प्रशासन आवश्यक खबरदारीबाबत दक्ष
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅब चे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये दोन पुरूष दोन महिलांचा समावेश आहे. हे चारीही परदेश वारी करून आले होते. हे सर्व रूग्ण आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. आता स्वॅब तपासणीच्या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत परदेशवारी करून 490 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 422 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 40 व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील 18 शहरी भागातील 10 व्यक्ती अशा एकूण 28 व्यक्ती आयसोलेशन कक्षात असून 4 व्यक्तींचे स्वॅब रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा