गुरुवार, २६ मार्च, २०२०

अंत्यविधी/ अंत्यविधी यात्रेसाठी 20 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मनाई - जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : कोरोनो विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक दि. २३ मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. सदर कालावधीत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येणे, गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील स्थलसिमा हद्दीत दिनांक 25 मार्च 2020 रोजी 12 वाजले पासून ते दिनांक 31 मार्च 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अंत्यविधी/ अंत्यविधी यात्रा यासाठी 20 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे.
00000
जिल्ह्यात सद्यस्थितीत परदेशवारी करुन आलेले 608 प्रवाशी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा