बुधवार, १८ मार्च, २०२०

कोरोना : विलगीकरण कक्षांची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पहाणी

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भारती हॉस्पीटल सांगली येथे स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास (आयसोलेशन वॉर्ड) भेट देऊन पाहणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे पूर्वी देण्यात आलेल्या सुचनांनुसार 6 खाटांचा आयसोलेशन कक्ष स्थापन करण्यात आलेला असून यामध्ये आणखी खाटांची वाढ करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सूचित केले. त्यानुसार हॉस्पीटलमधील अन्य कक्षांची पाहणी करून अतिरिक्त 15 बेडची व्यवस्था त्वरीत करण्याबाबत सूचित केले. यानुसार या ठिकाणी 21 आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.   आयसोलेशन कक्षामध्ये लागणारे व्हेंटीलेटर्स, पर्सनल प्रोटेक्टिव्ह किटस पुरेसा साठा करून ठेवण्याचेही आदेश दिले. तसेच या ठिकाणी नियुक्त करण्यात येणारे वैद्यकीय पथक 24 तास कार्यरत रहावे यासाठीही नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अधिष्ठाता डॉ. दिक्षीत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुर्ती, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता भोसले डॉ. सोमनाथ मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारती विद्यापीठ येथे भेट देऊन पहाणी केली. या ठिकाणी 6 खाटांचा अद्ययावत आयसोलेशन वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी आणखी अतिरिक्त 8 खाटांची व्यवस्था करावी अशा सूचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा