शुक्रवार, २० मार्च, २०२०

कोरोना : अनधिकृतपणे सुरू असलेल्या खाद्य विक्रीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. तसेच त्याअनुषंगाने जिल्ह्यातील अनधिकृतपणे सुरू असलेली खाद्य विक्री यामुळेही आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020 प्र.क्र.58/आरोग्य दि. 14 मार्च 2020 अन्वये सांगली जिल्ह्यातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या खाद्य विक्रीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा