शनिवार, २८ मार्च, २०२०

औद्योगिक आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवरील कामगारांना जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा पुरविणे बंधनकारक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली (जि.मा.का) 28 : सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या बाहेरील राज्यातील अथवा जिल्ह्यातील कामगारांची योग्य ती निवासाी व्यवस्था करून सदर कामगारांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा पुरविणे सदर औद्योगिक आस्थापनांना बंधनकारक राहील, असे आदेश जारी केले आहेत.
सदरचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) व (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020, जिल्हादंडाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडील आदेश क्र.गृह.1/कार्या-6/एमएजी-1/बं.आ./एसआर-08/2020 दि. 22 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा