मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोना : सांगली जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र ३१ मार्च पर्यंत बंद ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) :राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र दिनांक १७ ते ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्देशानुसार सर्व संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करून अनुपालन अहवाल सादर करावा. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा