गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोना : महानगरपालिका व नगरपरिषद कार्यक्षेत्रात दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच नगरपरिषद कार्यक्षेत्रातील व्यापाराच्या निमित्ताने होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता सर्व दुकाने टप्प्याटप्प्याने सकाळी दुपारी सुरू राहतील अशा तऱ्हेने दुकानांच्या वेळा ठरवाव्यात. याकरीता तात्काळ व्यापारी असोसिएशनची बैठक आयोजित करून याबाबतचे निर्देश द्यावेत तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महानगरपालिका सर्व नगरपरिषद प्रशासनास दिले आहेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा