गुरुवार, २६ मार्च, २०२०

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची गुढीपाडव्याची सुट्टी रद्द - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण सांगली जिल्ह्यातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. कोरोना आजारामुळे संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती उदभवू नये यासाठी पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आगत्याचे झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय विभागातील अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी तसेच कोरोना प्रतिबंधविषयक कर्तव्य बजविणारे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपले नेमणूकच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच गुढीपाडवा या सणानिमित्त दिनांक 25 मार्च 2020 रोजी देण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय विभागातील अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी तसेच कोरोना प्रतिबंधविषयक कर्तव्य बजविणारे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा