शुक्रवार, १३ मार्च, २०२०

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या मुख्यालयात हजर रहावे सुट्टीच्या दिवशीही मुख्यालय सोडू नये - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : सद्यस्थितीत जगातील बहुतांश देशामध्ये करोना आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे पुणे विभागात करोना विषाणू (कोवीड-19) चे रूग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू तीव्र स्वरूपाचा असल्याने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी कोवीड-19 ची लक्षणे आढळलेल्या संशयित रूग्णांना क्वारंन्टाईन ठिकाणी त्यापैकी तपासणी अंती ज्या रूग्णामध्ये कोवीड-19 ची लागण आहे, त्यांना तातडीने आयसोलेशन ठिकाणी ठेवून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या आहेत. पुणे विभागातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, इतर अधिकारी कर्मचारी तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना नियुक्तीच्या मुख्यालयात हजर रहाण्याचे कोणत्याही परिस्थितीत सुट्टीच्या दिवशीही मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
    या निर्देशाची तात्काळ काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुखांची राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा