रविवार, २२ मार्च, २०२०

कोरोना : तातडीच्या उपाययोजना व नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित

सांगली (जि.मा.का) दि. 22 :  कोराना व्हायरस (कोविड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावयाच्या उपाययोजना व नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली – 0233-2600500, टोल फ्री 1077, मो.क्र.  8208689681 / 9370333932, कोरोना नियंत्रण कक्ष (जिल्हा परिषद सांगली) – 0233-2373032, राज्यस्तरीय कोराना नियंत्रण कक्ष – 020-26127394, राष्ट्रीयस्तर नियंत्रण कक्ष – 91-11-23978046.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा