शुक्रवार, २० मार्च, २०२०

जिल्हा क्रीडा संकुल येथील क्वॉरंटाईन सुविधेची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा संकुलाच्या वसतिगृहामध्ये ६० बेडची क्वॉरंटाईन सुविधा निर्माण करण्यात आली असून सदर सुविधा अत्यंत उत्कृष्ट असल्याचे मत प्रत्यक्ष पाहणीनंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथील क्वॉरंटाईन सुविधेच्या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या समवेत महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय अधिकारी मिरज समीर शिंगटे, तहसिलदार रणजित देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असून स्वच्छतेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान जिल्ह्यात 261 प्रवासी परदेशवारी करून आले असून यातील दोन प्रवाशांना आयसोलेशन कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी एक प्रवासी सांगली येथील सिव्हील हॉस्पीटल येथे व दुसरा प्रवासी भारती हॉस्पीटलमधील आयसोलेशन कक्षात निरीक्षणाखाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा