रविवार, २२ मार्च, २०२०

कोरोना : मास्क व हँन्ड सॅनिटायझरच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाची अधिसूचना जारी

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : कोविड-19 विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क (२ प्लाई व ३ प्लाई), मास्क, मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या उत्पादनासाठी लागणारा मेल्ट ब्लोन नोन –वोवन फैब्रिक कच्चा माल व हँन्ड सॅनिटायझर च्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मेल्ट ब्लोन नोन –वोवन फैब्रिक ची किरकोळ किंमत 13 मार्च 2020 च्या एक महिना अगोदर म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजीच्या प्रचलित किंमतीपेक्षा अधिक राहणार नाही. मास्क (३ प्लाई सर्जिकल मास्क) ची किरकोळ किंमत दिनांक 13 मार्च 2020 च्या एक महिना अगोदर म्हणजे दि. 12 फेब्रुवारी 2020 रोजीची प्रचलित किंमत किंवा 10 रूपये प्रति मास्क यापैकी जी कमी असेल ती आणि मास्क (२ प्लाई) ची किरकोळ किंमत ८ रूपये प्रति मास्क पेक्षा अधिक राहणार नाही. हँन्ड सॅनिटायझरची किंमत 200 मिलीलीटर च्या प्रत्येक बाटलीसाठी 100 रूपये पेक्षा अधिक राहणार नाही. या किंमतीच्या प्रमाणातच हँन्ड सॅनिटायझरच्या इतर प्रमाणासाठी किंमत निश्चित केली जाईल, अशी अधिसूचना जारी केली आहे.
मास्क, सॅनिटायझरची विक्री विहीत दरानुसार होत नसल्यास सांगली जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक 0233-2373032 या क्रमांकावर कळवावे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा