शुक्रवार, २० मार्च, २०२०

कोरोना : निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देण्याचे टाळावे - जिल्हा कोषागार अधिकारी सुशीलकुमार केंबळे

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : कोव्हिड-19 आजाराचा धोका 60 वर्षा पेक्षा जास्त वयाच्या लोकांना अधिक असल्याने निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या शंका अडचणी यांच्या संदर्भात कोषागार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देण्याचे पुढील 15 दिवसासाठी टाळावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुशीलकुमार केंबळे यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारक आपल्या शंका अडचणी संदर्भात अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांच्या दूरध्वनी क्र. 0233-2381749 या क्रमांकावर किंवा ई-मेल to.sangli@zillamahakosh.in वर संपर्क साधू शकतात. तसेच शासनाने निवृत्तीवेतन धारकांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे सद्यस्थितीला राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची आवश्यकता नाही. निवृत्तीवेतन / कुंटुंबनिवृत्तीवेतन सध्या ज्या बँकेत घेत आहेत त्या बँकेत पाठविले जाईल यांची नोंद घ्यावी. तरी प्रत्यक्ष वैयक्तिक भेटी टाळून दूरध्वनी आणि ई-मेल संपर्काच्या सुरक्षित पर्यायाचा वापर करा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुशीलकुमार केंबळे यांनी केले आहे.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा