शुक्रवार, २७ मार्च, २०२०

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन येत्या काळात आणखी निर्णय घेणार नागरिकांनी प्रशासनाला योग्य सहकार्य करावे - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली (जि.मा.का) 27 : सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या आता 24 वर आली आहे. ही अत्यंत काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. सर्व रूग्ण हे एकाच कुटुंबातील आहेत. या रूग्णांवर योग्य उपचार सुरू असून काही रूग्णांशी संवादही साधला आहे. सर्व रूग्णाची प्रकृती सध्या स्थीर आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन येत्या काळात आणखी निर्णय घेईल. नागरिकांनी प्रशासनाला योग्य सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काही नियम आखले होते. मात्र आता ते नियम आणखी कडक केले जात आहेत. ज्या परिसरातील हे रूग्ण आहेत तो परिसर आधीच सील करण्यात आला होता. मात्र आता त्या परिसराच्या घरातील एकच व्यक्ती जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर सोडला जाईल. जो व्यक्ती बाहेर पडेल त्याच्या हातावर स्टॅम्प लावला जाईल. ज्या व्यक्तीच्या हातावर स्टॅम्प असेल त्यालाच घराबाहेर सोडले जाईल.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा