गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोना : मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद

सीएल-03 अनुज्ञप्तीधारकांना सिलबंद बाटलीतून मद्य विक्रीस परवानगी
               - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये सांगली जिल्ह्यातील पुढील मद्यविक्री आस्थापना (एफएल-3/फॉर्म ई/ई-2/एफएल-4/टिडी-1) अनुज्ञप्तीचे व्यवहार दि. 19 मार्च 2020 पासून दि. 31 मार्च 2020 अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच सीएल-03 अनुज्ञप्तीधारक यांनी ग्राहकांना अस्थापनेच्या मंजूर जागेत / परिसरात पिण्यास परवानगी देता केवळ सिलबंद बाटलीतून मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
या आदेशाश उल्लंघन झाल्यास अनुज्ञप्ती धारकाविरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा