गुरुवार, २६ मार्च, २०२०

अत्यावश्यक अन्न पदर्थांचे आस्थापना वगळून इतर सर्व पदार्थाचे आस्थापना बंद - सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपायायोजना आखणे आवश्यक आहे. जनतेची होणारी गर्दी टाळणे, गर्दी होऊ न देणे व त्याद्वारे कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नूसार जिल्ह्यातील दैनंदिन गरजेची अन्न उत्पादने जसे दुध, सर्व प्रकारचे खाद्यतेल, पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर, सर्व प्रकारचे मसाले, सर्व प्रकारची तृणधान्य व त्याचे पदार्थ(आटा, रवा, मैदा व सर्व प्रकारचे पिठे), कडधान्ये व त्याचे पदार्थ (बेसन व सर्व प्रकारच्या डाळी), हे अन्न पदार्थ वगळून इतर सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सांगली यांनी दिले आहेत.   
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा