शुक्रवार, २० मार्च, २०२०

कोरोना : सामान्य नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी मनाई - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : कोेरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) (m) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये संपूर्ण सांगली जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील सर्व खाजगी सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी मनाई केली आहे. मात्र धार्मिक स्थळांच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या पूजाअर्चा नित्यनियमांच्या विधीना प्रतिबंध असणार नाही, असे आदेश जारी केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा