गुरुवार, २६ मार्च, २०२०

तालुका कार्यक्षेत्रासाठी तहसिलदार Incident Commander - जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेची अमंलबजावणी व नियंत्रण करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) व (m), भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य 6 दि. 14 मार्च 2020,गृह विभाग, भारत सरकार यांचेकडील आदेश क्र. 40-3/2020 दि.24 मार्च 2020, नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना त्यांच्या संबंधित तालुका कार्यक्षेत्रासाठी Incident Commander म्हणून नेमणूक केली आहे.                                     
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा