शनिवार, २८ मार्च, २०२०

विदेशातून सांगली जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची यादी प्राप्त करून तात्काळ कार्यवाही करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली (जि.मा.का) 28 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांना नियुक्त करण्यात आलेले आहे. पोलीस प्रशासनास दिनांक 1 मार्च 2020 नंतर विदेशातून सांगली जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची यादी ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांच्याकडून प्राप्त करून जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यास सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सदरची यादी प्राप्त करून घेऊन त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच सदरच्या यादी व्यतिरिक्तही अन्य कोणी व्यक्तीही परदेशी जाऊन आलेले आढळून आल्यास त्यांच्या बाबतीत सुध्दा कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा