शुक्रवार, २० मार्च, २०२०

कुक्कुट मांस व अंडी यांच्या सेवनामुळे नोव्हेल करोना विषाणूचा प्रसार होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : कुक्कुट मांस अंडी प्रथिनाचे उत्तम स्वस्त स्त्रोत असून कुक्कुट उत्पादने मानवी आहारात वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कुक्कुट मांस अंडी यांच्या सेवनामुळे नोव्हेल करोना विषाणूचा प्रसार होत नाही, असे महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्तालयाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
समाजमाध्यमांमध्ये कुक्कुट पक्षांपासून मानवात नॉव्हेल करोना विषाणूचा प्रसार होत असल्याबाबतची अशास्त्रीय माहिती पसरविली जात होती. समाजमाध्यमांमध्ये अशास्त्रीय खोटी माहिती पसरविल्याबद्दल आवश्यक कायदेशीर कार्यवाही पशुसंवर्धन विभागामार्फत यापूर्वीच करण्यात आलेली आहे. आयुक्त पशुसंवर्धन, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी कुक्कुट पक्षांपासून नॉव्हेल करोना विषाणूचा प्रसार होत नसल्याबाबत स्पष्ट केलेले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी देखील अंडी कुक्कुट मांस यामधून नोव्हेल करोना विषाणूचा प्रसार होत नसून त्यांचे सेवन पूर्णपणे सुरक्षित असल्याबाबत प्रसिध्दी पत्रक निर्गमित केले असल्याचे महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्तालयाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा