शुक्रवार, २७ मार्च, २०२०

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 24 व्यक्तींना कोरानाची लागण यापैकी एक रूग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांची प्रकृती स्थीर, नागरिकांनी घाबरू नये - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे


सांगली (जि.मा.का) 27 : सांगली जिल्ह्यात एकूण 24 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यापैकी एक रूग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील आहे. हे सर्व रूग्ण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील त्यांचे निकटवर्तीय आहेत. यातील 4 जण हे परदेश वारी करून आले होते त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अंती आढळून आले. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी संपर्कात आलेल्या सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील त्यांच्या निकटवर्तीयांपैकी अशा 24 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
या सर्व लोकांची प्रकृती स्थीर असून यापैकी कोणालाही अतिदक्षता विभागात ठेवले नसून त्यांन व्हेंटीलेटरचीही आवश्यकता लागलेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये. यापूर्वीचे 12 आज नव्याने कोरोनाची लागण झालेले आढळून आलेले 12 अशा सर्व रूग्णांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या नव्याने काही लक्षणे उद्भवल्यास त्यांना तद्अनुषंगाने उपचार देण्यात येतील. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा अत्यंत समन्वयाने सांगलीकरांसाठी झटत आहे सांगली जिल्हावासीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे जनतेने पॅनिक होऊ नये घाबरूनही जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा