बुधवार, १८ मार्च, २०२०

कोरोना : भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सांगली व तासगाव येथील गणपती मंदिर दर्शनासाठी बंद

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सांगली तासगाव येथील गणपती मंदिर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शनासाठी सद्यस्थितीत 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय गणपती पंचायतन सांगली तासगव संस्थानांच्या वतीने घेण्यात आला आहे. अशी माहिती सांगली संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि तासगाव संस्थानचे व्यवस्थापक सुशिल थोरबोले यांनी दिली.
गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त पूजा मंदिरातील पुजारी यांच्याकडून करण्यात येईल. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर पूर्णपणे बंद राहील. संस्थानच्या या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन दोन्ही संस्थानांच्या वतीने करण्यात आले आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा