शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोनाला हरविण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करुया आजचा दिवस घरीच थांबुया - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली (जि.मा.का) दि. 21 :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू  पाळण्याचे सर्व भारतवासियांना अवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोरोनाला हरविण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व लोकांनी दिनांक 22 मार्च रोजी घरीच थांबून जनता कर्फ्यू  100 टक्के यशस्वी करावा असे अवाहन सांगली शहर व जिल्हा वासियांना केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जनता कर्फ्यू  हे अत्यंत महत्वाचे पाऊल असून गर्दीच्या ठिकाणी जाण्याने एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या संसर्गाला यामुळे आपण अटकाव करुन शकतो. सर्व सांगली जिल्हावासींयानी आपल्या स्वत:च्या , कुटुंबाच्या, शहराच्या, राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी एक दिवस घराबाहेर न पडून जनता करफ्यू यशस्वी करवा असे अवाहन करुन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अनेक व्यपारी संघटना व अन्य अस्थापनांच्या संघटनांनी उस्फुर्तपणे पुढील तीन ते चार दिवस आपआपल्या आस्थापना पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, पोलिस, महसूल, स्वच्छता विभाग आदी सर्व यंत्रणा रात्रं दिवस झटत आहेत. या सर्व यंत्रणेसाठी जनता करफ्यू दिवशी सायंकाळी 5 वा. नागरिकांनी आपआपल्या घरातच दरवाज्याजवळ, खिडकी जवळ, गॅलरीत येवून टाळ्या वाजवाव्यात व या यंत्रणांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी असे अवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले . जनता कर्फ्यू मधील आपल्या सर्वांचा सहभाग हा येणाऱ्या काळात कोरोणाचे संक्रमण थोपविण्यासाठी फार महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा