गुरुवार, २६ मार्च, २०२०

जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना तहसिल स्तरावर प्रमाणपत्र देणार - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 26, (जि. मा. का.) :  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने वाहतुकीच्या संदर्भात बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा पडू नये याकरीता आपत्कालीन परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांसाठी सर्व प्रकारची वाहने उपलब्ध करून देण्याच्या जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्यासाठी परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली असून प्रत्येक तहसील कार्यालयाशी त्यांना जोडून देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अशा वाहन धारकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. ही सुविधा जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने अत्यावश्यक सेवांमधील वाहने यांच्यासाठीच देण्यात आली आहे. याची नोंद घ्यावी. यासाठी शासन ऑनलाईन सुविधाही सुरू करत आहे याचाही लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण करण्याचे जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्यां वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्याचे कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने अधिकची माहिती देताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे म्हणाले, आवश्यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्यासाठी तहसीलनिहाय नेमणुक करण्यात आलेले मोटार वाहन निरीक्षक  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कंसात त्यांचे मो. क्र. अनुक्रमे पुढीलप्रमाणे. सांगली मुख्यालय - प्रशांत जाधव (7385389969), प्रशांत दगडे (9975279233), मिरज - आरती देसाई (9422406947), अभिजीत भोसले (9422020028), कवठेमहांकाळ - प्रदिप भाट (9011411904), अश्वीनी चव्हाण (7507085828), जत - अमर भंडारे (9942999171), किरण कारंडे (8421294328), तासगाव - ए. ए. पुजारी (8055991900), समाधान महानवर (7972995310), विटा - सागर चौगुले (9130459009), अर्चना पवार (7350948662), आटपाडी - नवाब मुजावर (8888544411), गणेश भानवसे (7218187079), इस्लामपूर - अभिजीत पोटे (9021256165), नेहा इदाते (9850079290), शिराळा - विष्णु चव्हाण (9130660102), संजय भोसले (7757930739), कडेगाव - सागर विश्वासराव (9545034411), धनश्री माळी (9970991525), पलूस - शंभुराजे पवार (9822415999), मयुर जगदाळे (7030334444).
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा